Marathi love shayari for girlfriend with image

New Marathi love shayari image

नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी एक आहे, मराठी शायरी, मराठी लव्ह शायरी, मराठी लव्ह शायरी मराठी भाषेत Marathi love shayari for girlfriend with image new Marathi shayari 2020 Marathi shayari for girlfriend romantic Marathi shayari

Marathi love shayari for girlfriend with image

Marathi love shayari

जेव्हा तू लाजुन गोड हसायची,
तुझ्या गालावर खळी पडायची…
जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी,
माझ्या वेड्या हद्यास भासायची…

New Marathi love shayari image

जेवढं बांधावं काव्यात
तेवढी तु निराकार होत जातेस…
समजुन सोडवावं म्हटलं तर
आणखीनच गुंतत जातेस…

जेव्हा जवळ यायचा तू
श्वास माझा फुलायचा
अन तुलाच पाहावेस वाटायचे
तुझ्या मिठीत हरवून जावे वाटायचे
तुला प्रेम करत तुलाच
स्वाधीन होऊन जायचे….

जेव्हा तुम्ही कोणा खास व्यक्ती बरोबर असता.
तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण
जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.
तेव्हा तुमची नजर त्यालाच शोधत असते…
हो ना

जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड
तो पर्यंत
तुझ्यावर प्रेम करणं
होणार नाही माझ्या कडून बंद..

ज्याने आयुष्यात पावलोपावली दुःख भोगलीय तिच
व्यक्ती नेहमी इतरांना हसवु शकते…
कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत,
गळताना ते नेहमी सांगत असत्,
कोणावर कितीही प्रेम केल तरी,
शेवटी कुणीच कुणाच नसत…

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…

झोंबते ही गार हवा
बघ कसा माझ्या तनी..
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी…

please read him-new Marathi love shayari

please read him-new Marathi love shayari

Marathi love shayari for girlfriend

झोका घेताना
येणारी तुझी आठवण
म्हणजे तुझ्या सोबत घालवलेल्या
गोड क्षणांची साठवण

ठोठावून दार ह्रदयाचे ,
जेव्हा तू आत येशील …
पसारा तुझ्याच आठवणींचा ,
ह्रदयात पाहशील …

डबडबलेल्या आसवानां बाहेर येण्या साठी
पापण्या मिटाव्या लागतात
ते अश्रु टीपण्या साठी
प्रेमळ हाथच असावे लागतात

डोळे तुझे कातील ,
ह्रदयावर वार करतात….
ह्रदयातील प्रेमाची अलगद ,
तार छेडतात….

डोळे पुसण्यास माझे
पाऊस धावूनी आला,
थेंब कोणता तुझा नि माझा
हेच कळेना म्हणाला.

डोळे माझे स्वप्न तुझे असावे,
ओंजळीत तुझ्या तारे माझे असावे…
झेप घेऊ दोघही प्रगतीची,
हाकेला माझ्या तुझे प्रतिसाद असावे…

डोळ्यांच काय
ते नेहमी पाणावतात
माझं तुझ्यावरचं प्रेम
अप्रत्यक्षपणे खुणावतात

डोळ्यांत तुझ्या पाहिलं की,
आरश्यात पहावसचं वाटत नाही
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही..

डोळ्यांनी व्यक्त केलेस
ते डोळ्यानिच ऎकले
पापण्या मिटता मिटता
आसवांनीच टिपले

डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण.

new 2020 Marathi love shayari

डोळ्यातील ते भाव तुझे
ओठांवर हे खुलतात
तुझे नि माझे हाथ प्रिये
बाहुपाशात अडकतात …

तसं सगल्याना नाही जमत
तुझ्यासारख वागणं,
ओठानवर जरी नसलं
तरी मानत माझं असन…

तसे प्रत्येकाला वाटते की
सुखात सहभागी होणारा,
दुःखात पाठीशी असणारा,
संकटात हातात हात धरणारा,
असा एक लाईफ़ पार्टनर
असावा जसा तुझ्यासारखा.

तिचं ते खोटं बोलणं
बोलताना दूसरी कडेच पाहणं
मधेच खाली पाहून लाजणं
लाजताना मग पुन्हा हसणं

तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे माझे विरह प्रेम.

तिची आठवण आली कि
तिची आठवण आली कि
मी आकाशाकडे बघतो
अन् ती दिसेल म्हणुन् उगाचच्..
तारे तुटन्यचि वाट् बघत् राहतो!

वाफ़ळत्या चहात् सुध्दा तिचाच् गन्ध् असतो..
त्या गन्धात् हरवुन्..
चहा मात्र थन्ड् होवुन् जातो!

ती समोर यायचि अन्
श्वास् श्वासत् अडकायचा
तिच्या गोड हसन्यात्…
जिव माझा कासाविस व्हायचा
मग्..
ति घाबरुन् माझा हात हाति घ्यायचि
तिच्या तप्त स्पर्शात्
मि सगळे विसरुन् जायचो!

आता मात्र तिचि आठवण आलि कि..
मि फ़क्त् माझ्याच् हाथाकडे बघतो
अन् हातावरल्या रेघामध्ये
तिच्या हातातल्या रेषा शोधतो!
तिचि आठवण् आल्यावर्….

तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात…

Marathi love shayari for WhatsApp

तिच्या बाबतीत मी ,
थोडा शहानपणाने वागतो…
ती दिसली रागवलेली ,
मीच माफी मागून घेतो..

तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच…तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन…

तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून

ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले

ती मला रोज पाहत असते
पाहतांना अन् उगाचच लाजते,
मी वेड्यासारखा तिलाच पाहतो
अन् उगाचच स्वप्नात हरवतो

ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही

ती वा-याची एक झुळुक
हळुच शेजारुन जाणारी,
जाता जाता पाहत वळुन
मंद गालातल्या गालात हसणारी.

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी
सुगंध त्याचा सुकनार नाही र

तु अशी काही पाहतेस,
की काळीज माझं तुझं होतं..
जे कधी माझ्यासाठी धडधडायचं,
ते आता तुझ्यासाठी धडधडतं..

तु आलीस अन्
भाव स्पर्श बोलके झाले,
तु गेल्यावर मात्र
शब्दही मुके झाले..

तु आहे म्हणुन तर…
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे..

please read him-new Marathi love shayari

Marathi love shayari 2020

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो…♥

तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,
म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!

तु माझ्या सोबत असलीस की,
एकटक तुला पाहावेसे वाटते..
तु मला पाहुन हसलीस की,
तिथेच तुझे पुन्हा व्हावेसे वाटते..

तु येणार असताना मध्येच
पावसावं येणं कळत नाही,
पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात
भिजण्याचा त्यात आनंद मिळ्त नाही.

तु लाजताना मनात काही
मी चांदण्यांला कवेत घ्यावे
हसू खुलेल्या तुझ्या अधीरी
अधीर माझे मी टेकवावे..

तु समोर असल्यावर
आसपास कुणी नसावं..
एकसारखं तासनतास
वाटतं पहात बसावं…

तुज्या डोळ्याना पाहिल्यावर
मला शिंप्ल्यांची आठवण यायची
तुझी पापनीही तुझया डोळ्याना
अगदी मोत्यासारखी जपायची

तुझ ते झुरने मला
त्यावेळेसच जाणवले होते
जेव्हा त्या शांत कातरवेळी
तुझे डोळे पानावले होते

तुझ प्रत्येक म्हणन ऐकल,
तुझ्यासाठी जगणच टाळल,
अगदी तुला विसरायचेही
तुला दिलेल प्रत्येक वचन पाळल !

तुझं खरं-खोटं
खरचं आता लक्षात आलं
तात्पर्य एवढंच की
सारं खोटं माझ्या पक्षात आलं

तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं ..!!

तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे
माझ्या मनासाठी अजूनही काही ओले
बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी

तुझा ‘अनोळखी’पणा ही
आता ओळखीचा वाटायला लागला आहे.
अनोळखी ‘तु’ असलीस तरीही
तो माझ्या ओळखीचा झाला आहे.

Marathi love shayari for boyfriend

तुझा तो पहिला स्पर्श
आजही मला आठवितो..
ते दुर्मिळ रोमांचीत क्षण
आजही मनात साठवितो….

तुझा तो स्पर्श सये
मी अजूनही जपतो आहे..
आठवणीतले ते क्षण
कणाकणाने टिपतो आहे….

तुझा माझा प्रत्येक क्षण
अजुन आठवांत आहे
तू परतून येशील पुन्हा
ही आस मनात आहे

तुझी आठवण आली ना की मला माझाच राग येतो,
संपले ना सर्व तुझ्याकडुन, मग असा का त्रास देतो?
नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी,
आठवुन सर्व काय करु? मग डोळ्यांत येते पाणी.

तुझी आठवण येण्यासाठी,
काळ वेळ लागत नाही.
तीही माझ्या सारखीच आहे,
तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही.

तुझी आठवण येते तेव्हा
तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो
तु येणार नाहीस माहित असतं
डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

तुझी एखादी कविता दे ना
माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला
सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला

तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी

तुझी प्रीत माझ्यासाठी जीवनाचा अनमोल ठेवा आहे
कधी विरहाचा चटका तर कधी मिलनाचा गारवा आहे.

तुझी वाट बघायला आवडेल मला, तुझं माझ्यावररागावनही आवडेल मला, जरूरी नाही फक्त माझीच व्हावीस तू, तुझ्या विरहात ही जगायला खरचं आवडेल मला.

तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

5 thoughts on “Marathi love shayari for girlfriend with image

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?