Marathi love status girlfriend with image 2020

Marathi love status

मित्रांनो, आपणा सर्वांचे स्वागत आहे, आज आमच्या एका नवीन पोस्टमध्ये, मी तुमच्यासाठी मराठी प्रेम स्थिती आणत आहे जी तुम्हाला खूप आवडेल, तुम्हाला आवडेल तेव्हा शेअर करायला विसरू नका, Marathi love status,new Marathi love status images

Marathi love status

2020 Marathi love status
Marathi love status

त्या दिवशीही जेंव्हा ति
समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही
मनात सारे गेले राहुन
शब्दच आज सुचलेच नाहीत

त्या दिवशी निरोप घेताना
माझ्याकडे बघुन गालात हसलीस..
पहिल्यांदाच काळजात धक होऊन
मनात माझ्या रुतुन बसलीस….

त्या वळणावर मी तुला
पुन्हा वळून पाहिले
काय करू तुला पहिल्या शिवाय
नाही राहवले

त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही

थेंबोथेंबी मग दिसतो
मज हसणारा तो चेहरा
थोडासा सावळ, निळसर
अन् थोडा रंगबिलोरा…

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !

दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!

दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर

दोघांच्या नात्याला काय नांव आहे हे
महत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहे
हे महत्वाचे आहे …. राधा आणि कृष्ण हे फक्त
एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग
त्यांना Best Couple म्हणते

Please Read him –love Shayari in Hindi

Marathi love status for girlfriend

नजरेत जरी अश्रू असले
तरी ओठावर हास्य असाव
ओठावरच्या हास्यामागे
नजरेतल्या अश्रूना लपवाव.

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,
कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,
भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,
हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.

नजरेला नजर भिडवनं
हा फक्त एक बहाणा होता,
तो तुझ्या-माझ्या प्रेमाचा
एक क्षणं, जुळलेला होता

नज़र ना लागो मला कुणाची
म्हणून तू माझी नजर काढून गेली ………
आठवणीत राहावे हे प्रेमळ क्षण
म्हणून तू गालावर माझिया काळजाचे बोट लावून गेली

नवे स्वप्न रंगवताना
जुन्यांचीही जाणीव असावी
नव्या स्वप्नातील पहाट
दाट धुक्याची नसावी

ना सम्पनरे अखंड स्वप्ना असवे,
ना बोलता अकु एतिल असी शब्द असवेत,
ग्रीष्मत पौस पदतील असी धाग असवेत,
ना मागाता सोबाट डेतिल असी मित्रा असवेत…

नाही कळले प्रेम तुला,
मी शब्दांतून मांडलेले.
भावनांचे ते विलक्षण मोती,
माझ्या हृदयातून सांडलेले…

निखळ मनाचे तुझे वागणे
मला प्रेमाने साद घालणे,
राग लोभ जरी आले गेले
उरले केवळ जीव लावणे,

निळाईच्या गर्द ह्रदयात
कदातरी सामावून घेशील का?
आकाशाचं स्वप्न नको मला
एकदातरी आपलं म्हणशील का?

नुसता कुणाला सांगता यावा
म्हणून तुझा विरह जपत नाही …
दुसऱ्या देहाचा तर विचारच सोड
मला दुसरे नावही खपत नाही ….

नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू ………. पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि आपण भेटत राहिलो तरच जगू

नुसतेच बघायचे, न बोलता
हे तुझे नेहेमीचे
ओठ मुके, नजर खाली
मला कसे कळायचे?

नेहमीच ठरवायचो तू उशीरा आल्यावर
आता तूझ्यावर रागवायचं…
पण तू दिसल्यावर माझंच मन
माझ्याविरुद्ध वागायचं…

Marathi love status for WhatsApp

नेहमीच वाटतं मला तू माझ्या
जवळ असावं…
तुझ्या सहवासातच सारे
आयुष्य जगावं…

पटकन हसणे पटकन रुसणे
मोहक तुझी आदा
तुझ्या मोहक सौंदर्यावर
आहे मी मनापासून फ़िदा

परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय
उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय

पहिल्यांदा बोललीस,
आणि घाबरुनच गेलीस.
पुन्हा एकदा बोललीस,
आणि कायमची विरघळलीस.

पाऊस एकदाचा पडून जातो
पावसाचे दिवस असले की
आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
एकदा डोळे पुसले की

पाऊस पडून गेलाय
मौसम सांद्र आहे …
सांगावेसे वाटतेय मला
की तू माझा चंद्र आहे !!!

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं

पाठवितो तारका किती मी
सांगण्या माझी प्रीत तुजवरी
जाळूनी तू त्यांना परी
का ग मजला दूर करी?

पान जरी कोरं असलं,तरी पानालाही भावना असतात.मन जरी वेडं असलं,तरी मनालाही भावना असतात.पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,

मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.मनं हे असचं असतं,इकडून तिकडे बागडत असतं.मनाला काही बंधनं असतात,म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात

पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघुन लाजत आहे..
तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
माझ्याच नावाने वाजत आहे…

Marathi love status for Facebook

पाय मुकेच चालतात,
परी मन आठवणींना ठेचाळते.
नजरे समोर गाव तुझे अंधुक,
अन ही वाट स्वप्नांकडे जाते.

पायातल्या काट्याने
फ़क्त पाय दुखावतो
मनातल्या काट्याने
पूर्ण माणूस विव्हळतो

पावसात भिजवासं वाटतंय ,
तुला घेवून आज…
चल भिजू पावसात ,
हातात घालून हात…

पावसासाठी आम्ही दोघे
होतो एकदम वेडे ,
चिंब आम्ही होऊन जातो
पडताच नक्षत्रांचे सडे .

पाहीलस….आता या डोळ्यातून
आसवही ओघळत नाही
तुला पुन्हा पुन्हा आठवून
जखमांना मी चिघळत नाही

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..

पाहून तुझ्याकडे, तो
चंद्रही म्हणत असावा…
रंग चांदण्यांसारखा ,
तुझ्यात कुठून यावा…

पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे..

पुन्हा पुन्हा सांगाव तुला,
तू आता माझ्या मनात नाहीस,
आता मी तुला,
कशातच शोधत नाही !

Marathi love status with image

पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे
तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये

पूर्ण होणार नाही म्हणुन स्वप्नच ब घायच नाही का ..,…? आपण कधी आवडीने जीवन जगायच नाही का ……?स्वप्न जरुर बघाव आणि जीवनही जरुर जगाव कारण ….. स्वप्नांमुळेच तर आपल जीवन जगण्यायोग्य बनत असत उद्या कशासाठी जगायच हे स्वप्न मधुन ठरत असत…

पौर्णिमेची रात हि
मिलनास आतुरलेली
तुझी नि माझी प्रीत
चांदण्यात बहरलेली …

प्रत्येक क्षण आठवतो
तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि
लाजवेल तो सुखाला.

प्रत्येक गोष्ट ह्रदयाच्या जवळ नसते. जिवन हे दु:खापासुन लांब नसते. आपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण, हीच एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशीबात नसतेँ.

प्रत्येक दिवशी आठवतात
या प्रेमाची खुप कारणं,
सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ऐक
तरी असा मुलगा असतो..
ज्याला ती कधिच विसरु शकत नाही…
आणि प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ऐक
तरी अशी मुलगी असते..
जिला तो मिळवू शकत नाही…

Marathi love status 2020

प्रत्येक वेळी फुलं समजून तुला जपत गेलो
काट्यांची ओळखही होऊ दिली नाही,
प्रत्येक क्षणी तुझ्या चेहऱ्यात चंद्र पहात गेलो
सूर्याची किरण तुझ्यावर पडू दिली नाही,

असं नाही की माझ्या प्रेमाला तू
साथ दिली नाही तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी,
काही सीमारेषा तू न मी कुणीही पुसू शकलं नाही..

प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का
पहा कधीतरी स्वताहून देता आल तर…
पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन
बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now ButtonCall Now
× How can I help you?